Sahawas Hospital Operation Theater
Announcement Important Information
 • Bring all prescriptions, Lab reports, X ray, Sonography or CT Scan reports with you.
 • While getting admitted wear loose cotton clothes. Do not carry valuable like ornaments, costly gadgets and extra cash.
 • Please bring your personal things like tooth brush, comb, towel, soap, powder etc. with you.
 • Please do not fast in hospital. Take diet as per Doctor's advise.
 • Only one relative can accompany the patient at night.
 • Avoid bringing small children to hospital.
 • Working hours: 10.00 am to 1.00 pm and 6.00 pm to 8.00 pm.
 • If situation arises patient can be shifted to ICU in other hospital.
Health Tips
 
 
Operation Theater
Dr. Maya Tulpule in Consultancy
Sahawas hospital
Ckeckup

• Blood Donation Camps • Annual Health Checkup Camp in September
• Charity to needy patients • Personalised Care

G.S.T

तो येणार - येणार अशी अनेक महिने हाकाटी उठली होती. थोडी भिती, थोडी उत्कंठा, थोडिशी उत्सुकता, जराशी धडधड, आपल्यावर तो किती बरसतो आणि किती नाही! याची अखेर १८-१९ मे रोजी श्रीनगर येथे झालेल्या बैठकीत होऊन एकदाचे शिक्कामोर्तब झाले आणि ३० जून आणि १ जुलैच्या मध्यरात्री तो वाजत गाजत आलाच! तो Goods and Services Tax म्हणजेच GST.

जून महिन्यापासूनच बँकांचे मेसेजेस यायला लागले. सर्व्हिस टॅक्स १५% वरुन १८% होणार, बायोमेडिकल वेस्ट कंपनी, वैद्यकीय उपकरणे, पुरविणाऱ्या कंपन्या, वार्षिक पेस्ट कंट्रोल, लिफ्टची देखभाल आणि इतर सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांकडून GST नंबरची विचारणा होवू लागली. डॉक्टर्स, हॉस्पिटल्सना GST लागतो का याची चर्चा सुरू झाली. फार्मा कंपन्यानी सावधगिरी म्हणून एक आठवडा औषधांचा पुरवठा बंद करण्याचे धोरण अवलंबिले. याउलट टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन इत्यादी घरगुती उपकरणांच्या विक्रेत्यांनी जुना स्टॉक काढून टाकण्यासाठी ५०% सवलत (टॅक्स वर) अशा मोठय़ा जाहिराती करून सेलचा धूमधडाका सुरू केला. जणु काही मोठी आपत्ती एक जुलैपासून येणार होती. ज्या केमिस्टस् चे व्यवहार स्वच्छ होते ते जरा निवांत होते, ST ऐवजी GST अशी त्यांची प्रतिक्रिया होती.

खर तर जून २०१२ मध्ये काढलेल्या नोटिसीत सध्याच्या कर आकारणी पद्धतीत फार बदल होणार नाहीत, फक्त Excise Duty, Service Tax आणि VAT ऐवजी GST लागू करण्यात येईल आणि पहिल्या वर्षी तरी कुठलेही धक्कादायक निर्णय घेतले जाणार नाहीत अशी ग्वाही रेव्हेन्यू सेक्रेटरी हसमुख अधिया यांनी दिली होती. जी एस् टी कौन्सिल मुख्य चार प्रकारात टॅक्स लावणार आहे - ५%, १२%, १८%, २८%. सर्वसाधारणपणे १८% टॅक्स मध्यवर्ती बिंदू असणार आहे. ५ आॅगस्टला काही फेरबदल होऊ शकतील.

सर्व वैद्यकीय आणि शैक्षणिक सेवांना GST लागू नाही. GST Council, Service Accounting Code (SAC) या पद्धतीने विविध प्रकारच्या सेवांची वर्गवारी करते. वस्तू वरील कर HSN पद्धतीने ठरविला जातो. अधिकांश वैद्यकीय सेवा Human Health and Social Care या सदरात मोडतात. पशुवैद्यकीय सेवा प्रोफेशनल, टेक्नीकल आणि बिझिनेस या सदरात मोडतात. काही SAC Codes पुढील प्रमाणे आहेत -

 • 999311 Inpatient Services
 • 999312 Medical and Dental Services
 • 999313 Childbirth and related Services
 • 999314 Nursing and Physiotherapy
 • 999315 Ambulance
 • 999316 Laboratory and Diagnostic-Imaging
 • 999317 Blood Bank, Sperm, Organ Bank
 • 999319 Homeopathy, Ayurveda, Unanimous, Naturopathy, Acupuncture etc.

वैद्यकीय क्षेत्रातील कर विषयक काही ठळक बाबी अशा आहेत -

 • वैद्यकीय शिक्षणावर कर नाही.
 • तपासणी फी आणि तपासण्यांवर कर नाही. परंतु औषधे आणि उपकरणे यांची वार्षिक उलाढाल २० लाखांपेक्षा जास्त असेल तर GST लागेल.
 • जीवनावश्यक औषधे करमुक्त असतील. Insulin वर ० ते ५%, Vaccines ५%, इतर औषधे १२% आणि Cosmetics २८% असे कर असतील.
 • पॅथॉलॉजिकल तपासणीसाठी वापरले जाणारे रिएजंट आणि कल्चर मिडिया यावर १२% ऐवजी १८% कर पडेल. Serological आणि Immunological तपासणी किटस् वर १२% कर लागेल परंतु Hepatitis तपासणी किट वर ५% च कर भरावा लागेल.
 • कुटुंब नियोजनासाठी वापरण्यात येणारी औषधे आणि कंडोम वर कर नाही.
 • रक्त, रक्त घटक, सीमेन, फ्रोझन सीमेन वर कर नाही.
 • श्रवणयंत्रावर कर नाही.
 • थर्मामीटर, हॉस्पिटल बेडस्, OT टेबल, इक्विपमेंटस्, डेंटल चेअर यावर १८% कर लागणार आहे. डिस्पोझेबल्स वर यापूर्वी २ ते ५.५ टक्के कर होता तो आता १२% होणार आहे. हाऊस कीपिंग, सेक्युरिटी, उपकरणांचे मेन्टेनन्स आणि स्टाफ कॉन्ट्रॅक्टवरील कर वाढणार आहे.
 • अँब्युलन्स सेवा कर मुक्त आहे.
 • कंपन्यांकडून मिळणाऱ्या भेट वस्तू आणि सोयी - सवलती GST अधिकाराखाली येऊ शकतील.
 • जनरल इंशुअरन्सच्या काही स्कीमस् वर कर नाही.
 • औषध कंपन्यांना सध्या Inverted Duty Structure ला सामोरे जावे लागते म्हणजेच आयात केलेल्या कच्च्या मालाची किंमत आणि ड्यूटी विक्रीसाठी तयार केलेल्या औषधापेक्षा जास्त आहे. आता Accrued Credit Refund लागू शकतो आणि त्याचा कंपन्यांना चांगला फायदा होऊ शकतो. मात्र काही औषधांच्या किमतीत २ ते ३% वाढ होऊ शकते.
 • मेडीकल टूरिझम पूर्वी पेक्षा थोडी महाग होऊ शकते. परंतु ई व्हिसा ऑन अरायव्हल, संबंधित सरकारी खात्यात सुसूत्रता आणून सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

एकूण काय या कर बदलाला सर्वांंनाच सामोरे जावे लागत आहे. अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची गरज आहे. C.A. ना देखील परिस्थितीचा नव्याने अभ्यास करावा लागणार आहे. ही संभ्रमावस्था दूर होण्यास काही महिने किंवा वर्ष देखील लागेल, पण त्याला इलाज नाही.

So let us wait and watch !!!

टीप: ही माहिती वेगवेगळ्या संकेतस्थळांवरुन घेतली आहे. याला कायदेशीर वैधता नाही.


Facilities available

 • Surgery
 • Medicine
 • Gynecology and Obstetrics
 • Orthopaedics
 • Psychiatry
 • ENT (Ear Nose Throat)
 • Ophthalmology
 • Dermatology
 • Urology
 • Laboratory
 • ECG
 • Portable X ray
 • Recognised Family Welfare Centre

About Sahawas Hospital

Working hours: 10.00 am to 1.00 pm | 6.00 pm to 8.00 pm.

Sahawas Hospital was established on September 5,1987 in Karvenagar area of Pune. Dr. Maya Tulpule is owner and founder of Sahawas Hospital.

Read more about Sahawas Hospital >>>


Recent Event

Felicitation on Women's day 2017 at the hands of Comissioner of Police, Pune - Ms. Rashmi Shukla

Health check-up camp - at Panditrao Agashe school, Pune


Health check-up camp was organised at Panditrao Agashe school, Pune

Health check-up camp - at Panditrao Agashe school, Pune